Apple Layoffs: अॅपल कंपनीही करणार कर्मचारी कपात
आयफोन निर्माता Apple आपल्या काही निवडक विभागांमधील कर्मचारी काही प्रमाणात कमी करत आहे. संभाव्य कर्मचारी कपातीचा कंपनीच्या विकास आणि उत्पादन वाढीवर परिणाम होण्याची शक्यता असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, कामावरुन कमी केल्या जाणाऱ्या कर्मचाऱ्यांची नेमकी संख्या समजू शकली नाही.

दावा केला जात आहे की,कंपनीतील ज्या विभागातील कर्मचाऱ्यांना कर्मचारी कपातीचा सर्वाधिक फटका बसला आहे त्यांच्यावर जगभरातील Apple रिटेल स्टोअर्स आणि इतर सुविधांच्या देखभालीची जबाबदारी आहे. सांगितले जात आहे की, संभाव्य आर्थिक मंदीच्या चिंतेच्या दरम्यान ही बातमी आली आहे. ज्यामुळे अलिकडच्या काही महिन्यांत विविध उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणात नोकऱ्या कमी झाल्या आहेत. बिग टेक कंपन्या देखील यापासून वाचल्या नाहीत
ट्विट
मेटा प्लॅटफॉर्म म्हणून ओळखल्या जाणाऱ्या Facebook नेही गेल्या महिन्यात जाहीर केला की ते 10,000 नोकर्या कमी करतील. पहिल्या फेरीत कंपनीने 11,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढले. लवकर मेटा कर्मचारी कपातीची पुढचीही फेरी काढणार असल्याचे समजते.
दरम्यान, केवळ फेसबुकच नव्हे तर अॅमेझॉन, मायक्रोसॉफ्ट, गूरल, झोमॅटो, स्वीगी, उबेर यांसारख्या कंपन्यांनीही कर्मचारी कपात केली आहे.