Apple Alert: झोपताना iPhone जवळ ठेवून चार्ज करत असाल तर व्हा सावध; कंपनीने जारी केला इशारा
टेक जायंटच्या मते, या सवयीमुळे आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. कंपनीने ग्राहकांना अशा प्रकारचा निष्काळजीपणा टाळण्याचा सल्ला दिला आहे.
झोपताना स्मार्टफोन आपल्या जवळ ठेवणे हे धोकादायक आहे. याबद्दल आत्तापर्यंत अनेक अभ्यास आणि रिपोट्स समोर आले आहेत. अशा अहवालांनुसार, झोपताना स्मार्टफोन जवळ ठेवणे ही आरोग्यासाठी धोक्याची घंटा आहे. आता आयफोन बनवणारी कंपनी ऍपलनेही आपल्या ग्राहकांसाठी याबद्दल इशारा जारी केला आहे. अॅपलने वापरकर्त्यांना सांगितले आहे की, झोपेत असताना त्यांचा आयफोन चार्जिंगवर ठेवू नका किंवा फोन चार्ज होत असताना त्यांच्या डिव्हाइसच्या शेजारी झोपू नका. टेक जायंटच्या मते, या सवयीमुळे आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. कंपनीने ग्राहकांना अशा प्रकारचा निष्काळजीपणा टाळण्याचा सल्ला दिला आहे. (हेही वाचा: Job Alert: स्मार्टफोन बनवणाऱ्या कंपन्यांमध्ये निर्माण होणार 60,000 पेक्षा नोकऱ्या; पुढील 6 ते 12 महिन्यांत बंपर हायरिंग अपेक्षित)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)