Thomas Cup Final 2022: भारतीय बॅडमिंटन संघाने रचला इतिहास; प्रथमच जिंकला थॉमस कपचा किताब, Bharat Mata Ki Jai ने गुंजले स्टेडिअम (Watch Video)

भारताने स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघाचा 3-0 असा व्हाईटवॉश करत पराभव केला. किदाम्बी श्रीकांतने जोनाथन क्रिस्टीवर सरळ सेटमध्ये विजय मिळवला आणि भारतीय संघाने पहिले विजेतेपद खिशात घातले. खेळाडू आणि सपोर्ट स्टाफने एकजुटीने ‘भारत माता की जय’चा जयघोष करत विजयाचा आनंद साजरा केला.

भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ (Photo Credit: Twitter)

Thomas Cup 2022 Final: भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाने (India Men's Badminton Team) 14 वेळच्या चॅम्पियन इंडोनेशियाचा (Indonesia) 3-0 पराभव करून स्पर्धेच्या 73 वर्षांच्या इतिहासात प्रथमच थॉमस कप (Thomas Cup) चषक विजेतेपदावर शिक्कामोर्तब केला. या विजयानंतर भारतीय खेळाडूंनी कोर्टवर धाव घेतली आणि श्रीकांतसोबत मिळून अविस्मरणीय विजय साजरा केला. खेळाडू आणि सपोर्ट स्टाफने एकजुटीने ‘भारत माता की जय’चा जयघोष करायला सुरुवात केली. त्याची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली.