Taliban: तालिबानचे परराष्ट्र मंत्री आमिर खान मुत्ताकी यांनी उपांत्य फेरीत पोहोचल्याबद्दल अफगाणिस्तान संघाचे केले अभिनंदन

ज्याचा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. ज्यामध्ये असे दिसून येते की, अफगाणिस्तानच्या ऐतिहासिक विजयानंतर तालिबानचे परराष्ट्र मंत्री मुट्टाकी यांनी रशीद खान यांच्याशी व्हिडिओ कॉलवर बोलून संघाचे अभिनंदन केले आणि उर्वरित स्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. अफगाणिस्तान पहिल्यांदाच टी-२० वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये पोहोचला आहे. मंगळवारी झालेल्या सुपर 8 सामन्यात अफगाणिस्तानने बांग्लादेश राष्ट्रीय क्रिकेट संघावर 8 धावांनी विजय मिळवला.

Taliban

 Taliban: तालिबानचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्ताकी यांनी अफगाणिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघाचा कर्णधार राशिद खानचे T20 विश्वचषक 2024 च्या पहिल्या उपांत्य फेरीत पोहोचल्याबद्दल अभिनंदन केले. ज्याचा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. ज्यामध्ये असे दिसून येते की, अफगाणिस्तानच्या ऐतिहासिक विजयानंतर तालिबानचे परराष्ट्र मंत्री मुट्टाकी यांनी रशीद खान यांच्याशी व्हिडिओ कॉलवर बोलून संघाचे अभिनंदन केले आणि उर्वरित स्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. अफगाणिस्तान पहिल्यांदाच टी-२० वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये पोहोचला आहे. मंगळवारी झालेल्या सुपर 8 सामन्यात अफगाणिस्तानने बांग्लादेश राष्ट्रीय क्रिकेट संघावर 8 धावांनी विजय मिळवला. अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना रहमानउल्ला गुरबाजच्या 43 धावांच्या जोरावर 5 विकेट गमावून 115 धावा केल्या. प्रत्युत्तरात बांगलादेशचा संघ 17.5 षटकांत 105 धावांवर थांबला. अफगाणिस्तानकडून कर्णधार राशिद खानने 4 षटकात 23 धावा देत 4 बळी घेतले. तर नवीन-उल-हकने 4 बळी घेतले. ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि बांगलादेश संघ उपांत्य फेरीतून बाहेर पडले होते. आता उपांत्य फेरीत अफगाणिस्तानचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. तर भारताचा सामना इंग्लंडशी होणार आहे.

पाहा पोस्ट:

Afghanistan's acting minister of foreign affairs, Amir Khan Muttaqi, had a video call with team captain Rashid Khan on Tuesday after their win against Bangladesh. Muttaqi congratulated the team on beating Bangladesh and on securing a spot in the T20 World Cup semi-finals. He also… pic.twitter.com/YdcA89EmU6

— Ariana News (@ArianaNews_) June 25, 2024

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



संबंधित बातम्या