Grand Welcome For Shivam Dube In His Home Town: शिवम दुबे याचं गावी जंगी स्वागत, सत्कार आणि प्रेमासह फुलांचा वर्षाव
भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू शिवम दुबे याचे त्याच्या गावी जोरदार स्वागत केले आहे. लोकांनी त्याच्यावर फुलांचा वर्षाव केला. कारमध्ये शिवमने पत्नीसोबत विजय परेडही केली
Grand Welcome For Shivam Dube In His Home Town: भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू शिवम दुबे याचे त्याच्या गावी जोरदार स्वागत केले आहे. लोकांनी त्याच्यावर फुलांचा वर्षाव केला. कारमध्ये शिवमने पत्नीसोबत विजय परेडही केली. लोकांनी हिप हिर हुर्रेचा नाराही लावला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दुबेने T20 विश्वचषक 2024 च्या फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 16 चेंडूत 27 धावा केल्या होत्या. ज्यामध्ये 3 चौकार आणि 1 षटकार मारला होता. तुम्ही खालील व्हिडिओ पाहू शकता. (हेही वाचा- हैदराबादमध्ये मोहम्मद सिराजची निघाली विजयी मिरवणुक, चाहत्यांसोबत गायलं 'लेहरा दो' गाणं; पाहा व्हिडिओ)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)