Rahul Dravid Receives Guard of Honour From Kids: T20 विश्वचषक 2024 च्या विजयानंतर राहुल द्रविडचे क्रिकेट अकादमीमध्ये जंगी स्वागत, मुलांनी दिला गार्ड ऑफ ऑनर (Watch Video)

लहान मुलांना गार्ड ऑफ ऑनर देत राहुल द्रविडचे जंगी स्वागत केले.

Rahul Dravid Receives Guard of Honour From Kids: दक्षिण आफ्रिकेला हरवत भारताने ICC पुरुष T20 विश्वचषक 2024 आपल्या नावे केला. त्यानंतर भारतात दाखल होताच टीम इंडीयाच्या सर्व खेळाडूंची भव्य विजयी मिरवणूक काढण्यात आली. सध्या सर्व स्तरातून खेळाडूंवर कौतुकांचा वर्षाव होत असताना विजेत्या टिमचे प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid)यांनी बंगळुरू येथील क्रिकेट अकादमीला भेट दिली तेथे उपस्थित मुलांकडून गार्ड ऑफ ऑनर मिळाला जंगी स्वागत झाले. द्रविड यांनी प्रथम पुष्पगुच्छ स्वीकारला आणि नंतर मुलांकडून गार्ड ऑफ ऑनर(Guard of Honour) घेतला. राहुल द्रविड यांची भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून कायम राहण्याची कोणतीही योजना नसल्याने गौतम गंभीरचा पुढील मुख्य प्रशिक्षक म्हणून विचार केला जात आहे असे अनेक अहवालातून सांगितले जात आहे.

पहा व्हिडीओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)