R Praggnanandhaa: आर प्रज्ञानंदचा 'क्लासिकल चेस'मध्ये दणदणीत विजय; मॅग्नस कार्लसनचा पराभव करत रचला इतिहास
स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत विजय मिळवत तो एकमेव विजेता ठरला आहे.
R Praggnanandhaa: वयाच्या अवघ्या 18व्या वर्षी भारतीय ग्रँड मास्टर आर प्रज्ञानंद (R Praggnanandhaa) याने मॅग्नस कार्लसन विरुद्धचा पहिला क्लासिकल विजय मिळवून इतिहास रचला आहे. नॉर्वे येथे पार पडत असलेल्या स्पर्धेत पहिल्या स्थानावर असलेल्या जागतिक क्रमांक एकच्या खेळाडू विरुद्ध खेळणे हे प्रज्ञानंदसाठी नेहमीच कठीण राहिले होते. गेल्या वर्षीच्या FIDE विश्वचषक स्पर्धेतही प्रज्ञानंद याला कार्लसन याला पराभूत करण्यासाठी मोठे परिश्रम घ्यावे लागले होते. या विजयासह, R Pragnanandaa तिसऱ्या फेरीअखेर 9 पैकी 5.5 गुणांसह नॉर्वे बुद्धिबळ 2024 स्पर्धेत (Norway Chess 2024) मध्ये आघाडीवर आहे. तर, झालेल्या पराभवामुळे मॅग्नस कार्लसनची स्पर्धेत पाचव्या स्थानावर घसरण झाली आहे. (हेही वाचा: GM R Praggnanandhaa याने वयाच्या 16 व्या वर्षी जिंकले नॉर्वे ओपन बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद)
पहा पोस्ट-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)