पॅरालिम्पिक खेळांची आजपासून सुरुवात; गूगलकडून खास Google Doodle प्रसारित

त्यावर गूगलकडून खास डूडल प्रसारित करण्यात आले आहे. GIF मध्ये, पक्षी हवेत उडताना दिसत आहेत.

Paris Paralympics 2024 Google Doodle

Paralympics 2024 Google Doodle : पॅरालिम्पिक( Paralympics) खेळांचा उद्घाटन सोहळा पॅरिसमधील सीन नदीच्या काठावर आज 28 ऑगस्ट रोजी होणार आहे. पॅरालिम्पिक खेळांचा पार्श्वभूमीवर गूगलकडून खास डूडल(Paralympic Google Doodle) प्रसारित करण्यात आले आहे. भारतीय वेळेनुसार उद्घाटन सोहळा रात्री 11.30 वाजता सुरू होईल. गूगलकडून प्रसारित करण्यात आलेल्या GIF डूडलमध्ये काही पक्षी हवेत उडताना दिसत आहे. त्याशिवाय, त्यात स्टॅंडअप बाईक दाखवण्यात आली आहे. पॅरालिम्पिक गेम्ससाठी जगभरातून पॅरा ॲथलीट पॅरिसमध्ये पोहचले आहेत. स्पर्धेतील 22 खेळांमध्ये 4400 खेळाडू सहभागी होणार आहेत. त्यात एकूण 549 पदके असतील, त्यापैकी 236 पदके महिलांसाठी असतील.(Pramod Bhagat : प्रमोद भगतवर 18 महिन्यांच्या निलंबनाची कारवाई; पॅरिस 2024 पॅरालिम्पिक स्पर्धेला मुकणार)

पॅरालिम्पिक गूगल डूडल

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)