T20 World Cup, PAK vs AFG: अफगाणिस्तानविरुद्धचा सामना पाकिस्तानने घातला खिशात, आसिफ अलीने 4 षटकार ठोकत केली विजयाची हॅट्रीक

T20 विश्वचषक 2021 च्या 24 व्या सामन्यात बाबर आझमचे शानदार अर्धशतक आणि आसिफ अलीच्या तुफानी फटकेबाजीच्या जोरावर पाकिस्तानने अफगाणिस्तानचा पराभव केला आहे.

T20 विश्वचषक 2021 च्या 24 व्या सामन्यात बाबर आझमचे शानदार अर्धशतक आणि आसिफ अलीच्या तुफानी फटकेबाजीच्या जोरावर पाकिस्तानने अफगाणिस्तानचा पराभव केला आहे. पाकिस्तानने हा सामना 5 गडी राखून जिंकला असून या स्पर्धेतील त्यांचा हा सलग तिसरा विजय आहे. या विजयासह पाकिस्तानचा उपांत्य फेरीतील प्रवेश जवळपास निश्चित झाला आहे.

पाकिस्तानकडून बाबर आझमने 51 धावांची खेळी खेळली. मात्र दबावाने भरलेल्या क्षणांमध्ये आसिफ अलीने 7 चेंडूत 25 धावा करत संघाला विजय मिळवून दिला.  आसिफ अलीने 19व्या षटकात 4 षटकार मारून सर्वांना आश्चर्यचकित केले आणि त्याला सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now