Tennis: नंबर 1 महिला टेनिसपटू Ash Barty हिची वयाच्या 25 व्या वर्षी तडफडकी निवृत्ती, नुकतीच बनली होती ऑस्ट्रेलियन ओपन चॅम्पियन

बार्टीने तिच्या निर्णयाची पुष्टी करत इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला. तिने सोशल मीडिया पोस्टमध्ये निर्णयामागील तपशील सांगितला नाही परंतु घोषणेनंतर पत्रकार परिषदेत अधिक तपशील उघड केले जातील असे आश्वासन दिले.

एश्ले बार्टी (Photo Credit: PTI)

WTA वर्ल्ड नंबर 1 ऍश बार्टी (Ash Barty) हिने वयाच्या 25 व्या वर्षी या खेळातून निवृत्तीची घोषणा करून टेनिस (Tennis) विश्वाला आश्चर्याचा धक्का दिला. बार्टीने तिच्या निर्णयाची पुष्टी करत इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला. बार्टीने या वर्षी जानेवारी महिन्यात ऑस्ट्रेलियन ओपन (Australian Open) 2022 चा किताब जिंकला होता. तर ऑस्ट्रेलियनने पुढे नमूद केले की ती “दीर्घ काळापासून” निवृत्तीचा विचार करत होती आणि 2021 मध्ये विम्बल्डन (Wimbledon) विजयाने तिला निवृत्तीचा विचार करण्यास प्रवृत्त केले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ash Barty (@ashbarty)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)