Tennis: नंबर 1 महिला टेनिसपटू Ash Barty हिची वयाच्या 25 व्या वर्षी तडफडकी निवृत्ती, नुकतीच बनली होती ऑस्ट्रेलियन ओपन चॅम्पियन
WTA वर्ल्ड नंबर 1 ऍश बार्टी हिने वयाच्या 25 व्या वर्षी या खेळातून निवृत्तीची घोषणा करून टेनिस विश्वाला आश्चर्याचा धक्का दिला. बार्टीने तिच्या निर्णयाची पुष्टी करत इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला. तिने सोशल मीडिया पोस्टमध्ये निर्णयामागील तपशील सांगितला नाही परंतु घोषणेनंतर पत्रकार परिषदेत अधिक तपशील उघड केले जातील असे आश्वासन दिले.
WTA वर्ल्ड नंबर 1 ऍश बार्टी (Ash Barty) हिने वयाच्या 25 व्या वर्षी या खेळातून निवृत्तीची घोषणा करून टेनिस (Tennis) विश्वाला आश्चर्याचा धक्का दिला. बार्टीने तिच्या निर्णयाची पुष्टी करत इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला. बार्टीने या वर्षी जानेवारी महिन्यात ऑस्ट्रेलियन ओपन (Australian Open) 2022 चा किताब जिंकला होता. तर ऑस्ट्रेलियनने पुढे नमूद केले की ती “दीर्घ काळापासून” निवृत्तीचा विचार करत होती आणि 2021 मध्ये विम्बल्डन (Wimbledon) विजयाने तिला निवृत्तीचा विचार करण्यास प्रवृत्त केले.
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 23, 2022 08:29 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

