Wrestlers Protest: जागतिक पातळीवर पोहोचले कुस्तीपटूंचे आंदोलन; United World Wrestling ने दिला पाठींबा, रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियावर बंदी घालण्याची धमकी
युडब्ल्यूडब्ल्यूने एक निवेदन जारी करून भारतामधील कुस्तीपटूंवरील पोलीस कारवाई आणि त्यांच्या अटकेचा तीव्र निषेध केला. तसेच ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात सुरू असलेल्या तपासाबाबतही निराशा व्यक्त केली.
देशातील कुस्तीपटूंकडून सुरू असलेले आंदोलन आता आंतरराष्ट्रीय मुद्दा बनला आहे. युनायटेड वर्ल्ड रेसलिंग अर्थात युडब्ल्यूडब्ल्यूने कुस्तीपटूंच्या आंदोलनाची दाखल घेतली आहे. युनायटेड वर्ल्ड रेसलिंग या रेसलिंगच्या जगातील सर्वोच्च संस्थेने भारतीय कुस्ती महासंघाला बरखास्त करण्याची धमकी दिली आहे. आज म्हणजेच 30 मे रोजी, युडब्ल्यूडब्ल्यूने एक निवेदन जारी करून भारतामधील कुस्तीपटूंवरील पोलीस कारवाई आणि त्यांच्या अटकेचा तीव्र निषेध केला. तसेच ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात सुरू असलेल्या तपासाबाबतही निराशा व्यक्त केली. यासह ब्रिजभूषण शरण सिंग यांच्यावरील आरोपांची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्याचे आवाहन अधिकाऱ्यांना केले. भारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणुका 45 दिवसांत न घेतल्यास भारताला निलंबित करण्याची चर्चा आहे. गेल्या एक महिन्यापासून कुस्तीपटू साक्षी मलिक, विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांच्या नेतृत्वाखाली देशभरातील कुस्तीपटू भारतीय कुस्ती प्रमुख ब्रिजभूषण शरण यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप करत, आंदोलन करत आहेत. (हेही वाचा: Wrestlers Protest: नरेश टिकैत यांनी कुस्तीपटूंना पदके गंगेत विसर्जित करण्यापासून रोखले; मागितला 5 दिवसांचा वेळ)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)