Wimbledon 2022: रशिया आणि बेलारूस खेळाडूंवर विम्बल्डनमध्ये बंदी, युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानिषेधार्त निर्णय; डॅनिल मेदवेदेवसह अनेक दिग्गज बाहेर
युक्रेनवर रशियाने केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ विम्बल्डनचे आयोजक AELTC ने 27 जून ते 10 जुलै दरम्यान होणाऱ्या ग्रँड स्लॅममधून रशिया आणि बेलारूसच्या खेळाडूंवर बंदी घातली आहे. विम्बल्डनचे आयोजक ऑल इंग्लंड लॉन टेनिस क्लबने सांगितले की ते ‘शक्यतम मार्गाने रशियाचा जागतिक प्रभाव मर्यादित करण्यासाठी’ काम करत आहेत.
पुरुष जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकाचा टेनिसपटू रशियाचा डॅनिल मेदवेदेव (Daniil Medvedev), जागतिक क्रमवारीत आठव्या स्थानी असलेला आंद्रे रुबलेव आणि चौथ्या क्रमांकाची बेलारूसची महिला टेनिसपटू आर्यन सबालेन्का (Aryna Sabalenka) जगातील प्रतिष्ठित ग्रँडस्लॅम विम्बल्डनला (Wimbledon) मुकणार आहेत. युक्रेनवर रशियाने केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ विम्बल्डनचे आयोजक ऑल इंग्लंड लॉन टेनिस क्लबने 27 जून ते 10 जुलै या कालावधीत होणाऱ्या ग्रँड स्लॅममधून रशिया आणि बेलारूसच्या टेनिसपटूंवर बंदी घातली आहे. आयोजकांनी हा निर्णय घेतला असून ते लवकरच जाहीर करण्याचा दावा ब्रिटीश माध्यमांनी केला आहे.
Statement regarding Russian and Belarusian individuals at The Championships 2022.
— Wimbledon (@Wimbledon) April 20, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 20, 2022 09:28 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

