Turkish football club: फुटबॉलचे मैदान बनले कुस्तीचा आखाडा, सामन्या दरम्यान संघ मालकाची रेफ्रीला मारहाण

अंकारा येथील एरीमन स्टेडियमवर कैकूर रिझस्पोर आणि अंकीरागुकू या संघात सामना चालू होता. हा सामना चालू असताना एका फुटबॉल क्लबच्या मालकाने लाइव्ह सामन्यात रेफ्रीला मारहाण केली.

सध्या सुरू असलेल्या तुर्की सुपर फुटबॉल लीगच्या (Turkish Super Football League) सामन्यात मैदान हे कुस्तीचा आखाडा बनलेले पहायला मिळाले. अंकारा येथील एरीमन स्टेडियमवर कैकूर रिझस्पोर आणि अंकीरागुकू या संघात सामना चालू होता. हा सामना चालू असताना एका फुटबॉल क्लबच्या मालकाने लाइव्ह सामन्यात रेफ्रीला मारहाण केली. सामना सुरु असताना आधी धावत येत त्यांने आधी जोरदार मुक्का रेफ्रीला मारला. यानंतर खाली पडल्यावर लाथा बुक्यांनी त्याला मारले. हा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. या मारहाणी रेफ्री जखमी झाले असून त्यांना उचलून ड्रेसिंग रूममध्ये नेण्यात आले. दरम्यान कैकूर रिझस्पोरच्या मालकाला पोलिसांनी अटक केली आहे.

पाहा व्हिडिओ -

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement