Thailand Open 2022: थायलंड ओपनच्या उपांत्य फेरीत PV Sindhu पराभूत, चीनच्या ऑलिम्पिक चॅम्पियनने चारली धूळ

जागतिक क्रमवारीत चौथी सिंधूला सरळ गेममध्ये 21-17, 21-16 असा पराभव पत्करावा लागला. ऑलिम्पिक चॅम्पियन आणि जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर असलेल्या चेन युफेईचा सामना करत सिंधूने काट्याची टक्कर दिली, पण अखेरीस तिच्या पदरी पराभवाची निराशाच आली.

पीव्ही सिंधू (Photo Credit: PTI)

दुहेरी ऑलिम्पिक पदक विजेत्या पीव्ही सिंधूला (PV Sindhu) थायलंड ओपन (Thailand Open) बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले आहे. तिला टोकियो ऑलिम्पिक चॅम्पियन चीनच्या चेन यू फेई (Chen Yu Fei) ने सरळ गेममध्ये 21-17, 21-16 ने पराभूत केले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)