Special Olympics-Summer Games: विशेष ऑलिम्पिक जागतिक क्रीडा स्पर्धेसाठी 198 खेळाडूंसह 280 सदस्यांचा समावेश असलेला भारतीय संघ बर्लिन येथे रवाना
या जागतिक स्पर्धेत 190 देशांमधून 7000 हून अधिक खेळाडू सहभागी होत आहेत. 17 ते 25 जून दरम्यान होणाऱ्या या भव्य स्पर्धेत 16 विविध क्रीडा प्रकारांमध्ये भारतीय खेळाडू पदकांसाठी लढताना पहायला मिळणार आहेत.
198 खेळाडूंसह 280 सदस्यांचा समावेश असलेला भारतीय संघ 12 जून रोजी विशेष ऑलिम्पिक जागतिक क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जर्मनीतील बर्लिन येथे रवाना झाला. प्रवासाला निघण्यापूर्वी 8 जून रोजी झालेल्या निरोप समारंभात युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांना भेटण्याची संधी संघाला मिळाली. युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्र्यांनी विशेष ऑलिम्पिकमधील भारतीय चमूच्या सहभागासाठी 7.7 कोटी रुपये निधी मंजूर केला असून आजपर्यंतची स्पर्धेसाठी मंजूर केलेली सर्वाधिक रक्कम आहे. भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या जवाहरलाल नेहरू स्टेडियम, दिल्ली येथे या जागतिक स्पर्धेच्या तयारीसाठी संघाचे पूर्वतयारी प्रशिक्षण शिबिरही पार पडले होते. या जागतिक स्पर्धेत 190 देशांमधून 7000 हून अधिक खेळाडू सहभागी होत आहेत. 17 ते 25 जून दरम्यान होणाऱ्या या भव्य स्पर्धेत 16 विविध क्रीडा प्रकारांमध्ये भारतीय खेळाडू पदकांसाठी लढताना पहायला मिळणार आहेत. (हेही वाचा: पंतप्रधान मोदींनी महिला हॉकी ज्युनियर खेळाडूंचे केले कौतुक, भारतीय संघाने आशिया कप जिंकून इतिहास रचला)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)