Carlos Alcaraz Wins Wimbledon Final 2024: स्पेनच्या कार्लोस अल्काराझने रचला इतिहास, नोव्हाक जोकोविचला हरवून दुसऱ्यांदा विम्बल्डनचे विजेतेपद पटकावले

अल्काराझने जोकोविचचा 6-2, 6-2, 7-6 अशा सरळ सेटमध्ये पराभव करून सलग दुसऱ्यांदा हे विजेतेपद पटकावले आहे.

Wimbledon Final 2024: स्पेनच्या कार्लोस अल्काराझने विम्बल्डन 2024 च्या अंतिम फेरीत नोव्हाक जोकोविचचा पराभव करून दुसऱ्यांदा विम्बल्डनचे विजेतेपद पटकावले आहे. अल्काराझने जोकोविचचा 6-2, 6-2, 7-6 अशा सरळ सेटमध्ये पराभव करून सलग दुसऱ्यांदा हे विजेतेपद पटकावले आहे. 24 वेळचा ग्रँडस्लॅम विजेता जोकोविच गेल्या वर्षी विम्बल्डनच्या अंतिम फेरीत अल्काराजकडून पराभूत झाला होता. 2024 च्या फायनलमध्ये स्पेनच्या कार्लोस अल्काराझने जोकोविचविरुद्ध पहिले दोन सेट सहज जिंकले होते. त्याने पहिले दोन सेट 6-2, 6-2 असे जिंकले, पण तिसऱ्या सेटसाठी त्याला खूप संघर्ष करावा लागला. तिसरा सेट टायब्रेकरपर्यंत गेला, ज्यामध्ये 21 वर्षीय कार्लोसने कारकिर्दीतील चौथे ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now