Indonesia Open 2023: सात्विकसाईराज आणि चिराग शेट्टी या जोडीने इतिहास रचला, जगज्जेत्याला हरवून इंडोनेशिया ओपनचे विजेतेपद पटकावले
पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत भारतीय जोडीने अॅरॉन चिया आणि सोह वुई यिक या मलेशियाच्या जोडीचा 21-17, 21-18 असा सरळ गेममध्ये पराभव केला.
भारतीय बॅडमिंटनपटू सात्विकसाईराज रँकीरेड्डी (Satwiksairaj Rankireddy) आणि चिराग शेट्टी या (Chirag Shetty) जोडीने इंडोनेशिया ओपनचे विजेतेपद पटकावले आहे. पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत भारतीय जोडीने अॅरॉन चिया आणि सोह वुई यिक या मलेशियाच्या जोडीचा 21-17, 21-18 असा सरळ गेममध्ये पराभव केला. सात्विक आणि चिराग या जोडीचे हे पहिले सुपर 1000 वर्ल्ड टूर विजेतेपद आहे. मलेशियाच्या जोडीविरुद्ध 7 वेळा पराभूत झाल्यानंतर सात्विक आणि चिराग यांनी पहिला विजय मिळवला. अॅरोन चिया आणि सोह वुई यिक ही जोडी पुरुष दुहेरीत जगज्जेते आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)