Sangram Singh Creates History: संग्राम सिंगने रचला इतिहास; ठरला MMA सामना जिंकणारा पहिला भारतीय पुरुष कुस्तीपटू

आपल्या उल्लेखनीय कारकिर्दीसाठी प्रसिद्ध असलेल्या संग्रामने याआधी कॉमनवेल्थ हेवीवेट कुस्ती स्पर्धेत भाग घेतला आहे, तसेच अनेक आंतरराष्ट्रीय मंचांवर भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.

Sangram Singh (Photo Credit : X)

Sangram Singh Creates History: अष्टपैलू भारतीय कुस्तीपटू संग्राम सिंगने पुन्हा एकदा देशासाठी गौरवशाली यश प्राप्त केले आहे, जॉर्जियातील तिबिलिसी येथे झालेल्या गामा इंटरनॅशनल फाइटिंग चॅम्पियनशिपमधील पहिल्या एमएमए सामन्यात महत्त्वपूर्ण विजय प्राप्त केला आहे. संग्राम सिंगने पाकिस्तानचा आंतरराष्ट्रीय खेळाडू अली रझा निसारचा अवघ्या 1 मिनिट 30 सेकंदात पराभव केला. यासह संग्राम हा एमएमए सामना जिंकणारा पहिला भारतीय पुरुष कुस्तीपटू ठरला आहे. सामना जिंकल्यानंतर संग्राम सिंग म्हणाला, ‘देशाचे प्रतिनिधित्व करत हा विजय मिळवल्याचा मला खूप अभिमान वाटतो. हा विजय भारतातील एमएमएच्या चांगल्या भविष्याच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे.’

आपल्या उल्लेखनीय कारकिर्दीसाठी प्रसिद्ध असलेल्या संग्रामने याआधी कॉमनवेल्थ हेवीवेट कुस्ती स्पर्धेत भाग घेतला आहे, तसेच अनेक आंतरराष्ट्रीय मंचांवर भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. रिंगमधील त्याच्या कौशल्यासह, संग्राम सिंग सरकारच्या फिट इंडिया चळवळीचे प्रतिनिधित्वही करतो. तो फिट इंडिया आयकॉन म्हणून काम करतो, जेथे लाखो लोकांना निरोगी जीवन जगण्यासाठी प्रेरित केले जाते. तो विकास भारत आणि स्वच्छ भारत सारख्या मोहिमांचा ब्रँड ॲम्बेसेडरही आहे. (हेही वाचा: Ravichandra Ashwin New Record: आर अश्विनने चेन्नई कसोटीत रचली विक्रमांची मालिका, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये घडवली मोठी कारकीर्द)

संग्राम सिंग ठरला एमएमए सामना जिंकणारा पहिला भारतीय पुरुष कुस्तीपटू- 

 

 

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)