Asian Champions Trophy 2023: आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत भारताने जपानचा केला पराभव, सचिन तेंडुलकरने महिला हॉकी संघाचे केले कौतुक

या मोठ्या विजयानंतर भारताचा माजी क्रिकेटपटू मास्ट ब्लास्टर सचिन तेंडुलकरने महिला हॉकी संघाचे कौतुक केले आहे.

आशियाई खेळ 2023 (Asian Champions Trophy 2023) मधील निराशाजनक कामगिरीनंतर भारतीय महिला हॉकी संघाने रांची येथे झालेल्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीची अंतिम फेरी जिंकून सुवर्णपदक जिंकले. अंतिम सामन्यात भारतीय महिला संघाचा सामना जपानच्या संघाशी होता आणि दोघांमधील हा सामना मरंग गोमके जयपाल सिंग मुंडा अॅस्ट्रोटर्फ हॉकी स्टेडियम, रांची येथे झाला. या सामन्यात भारतीय महिला संघाने एकतर्फी कामगिरी करत 4-0 असा विजय मिळवला. या मोठ्या विजयानंतर भारताचा माजी क्रिकेटपटू मास्ट ब्लास्टर सचिन तेंडुलकरने महिला हॉकी संघाचे कौतुक केले आहे. तो म्हणाला, 'आमच्या महिला हॉकी संघाने दिवाळीच्या दिव्यांची नवी चमक आणली आहे! आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये 4-0 ने शानदार विजय मिळवून, आमच्या महिला हॉकी संघाने यावर्षी दिवाळी लवकर आणली आहे. चॅम्पियन्सचे अभिनंदन!' (हे देखील वाचा: SL vs BAN ICC World Cup 2023 Toss Update: बांगलादेशने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय, श्रीलंका प्रथम करणार फलंदाजी)

पाहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)