Asian Champions Trophy 2023: आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत भारताने जपानचा केला पराभव, सचिन तेंडुलकरने महिला हॉकी संघाचे केले कौतुक
भारतीय महिला संघाने एकतर्फी कामगिरी करत 4-0 असा विजय मिळवला. या मोठ्या विजयानंतर भारताचा माजी क्रिकेटपटू मास्ट ब्लास्टर सचिन तेंडुलकरने महिला हॉकी संघाचे कौतुक केले आहे.
आशियाई खेळ 2023 (Asian Champions Trophy 2023) मधील निराशाजनक कामगिरीनंतर भारतीय महिला हॉकी संघाने रांची येथे झालेल्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीची अंतिम फेरी जिंकून सुवर्णपदक जिंकले. अंतिम सामन्यात भारतीय महिला संघाचा सामना जपानच्या संघाशी होता आणि दोघांमधील हा सामना मरंग गोमके जयपाल सिंग मुंडा अॅस्ट्रोटर्फ हॉकी स्टेडियम, रांची येथे झाला. या सामन्यात भारतीय महिला संघाने एकतर्फी कामगिरी करत 4-0 असा विजय मिळवला. या मोठ्या विजयानंतर भारताचा माजी क्रिकेटपटू मास्ट ब्लास्टर सचिन तेंडुलकरने महिला हॉकी संघाचे कौतुक केले आहे. तो म्हणाला, 'आमच्या महिला हॉकी संघाने दिवाळीच्या दिव्यांची नवी चमक आणली आहे! आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये 4-0 ने शानदार विजय मिळवून, आमच्या महिला हॉकी संघाने यावर्षी दिवाळी लवकर आणली आहे. चॅम्पियन्सचे अभिनंदन!' (हे देखील वाचा: SL vs BAN ICC World Cup 2023 Toss Update: बांगलादेशने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय, श्रीलंका प्रथम करणार फलंदाजी)
पाहा ट्वीट
दिवाली की रोशनी में नई चमक लाई है, हमारी महिला हॉकी टीम ने!
With a sparkling 4-0 win in the #AsianChampionsTrophy, our women's hockey team has brought Diwali early this year.
Congratulations to the champions! 🇮🇳 pic.twitter.com/yfCLxZqO1p
— Sachin Tendulkar (@sachin_rt) November 6, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 06, 2023 01:55 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

