R Praggnanandhaa: 16 वर्षीय प्रज्ञानंदने तीन महिन्यात दुसऱ्यांदा नंबर 1 बुद्धिबळ मास्टरचा केला पराभव, 40व्या चालीत कार्लसनने मोठी केली चूक
16 वर्षीय प्रज्ञानंधाने फेब्रुवारीमध्ये एअरथिंग्स मास्टर्स या ऑनलाइन जलद बुद्धिबळ स्पर्धेत मॅग्नस कार्लसनला प्रथमच पराभूत केले होते.
शुक्रवारी चेसबल मास्टर्स (Chessable Masters) ऑनलाइन जलद बुद्धिबळ स्पर्धेच्या 5 व्या फेरीत भारतीय ग्रँड मास्टर प्रज्ञानंधा (Praggnanandhaa) रमेशबाबू याने 2022 मध्ये विश्वविजेता मॅग्नस कार्लसनवर (Magnus Carlsen) यावर्षात दुसरा विजय मिळवला. कार्लसनची एक चूक - त्याच्या 40व्या चालीमध्ये चुकीचा ब्लॅक नाइट - त्याला पराभवाच्या रूपात महागात पडली.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)