Pro Kabaddi 2022 Final: प्रो कबड्डी 2022 च्या अंतिम फेरीत Jaipur Pink Panthers ने पटकावले 9व्या हंगामाचे विजेतेपद; Puneri Paltan चा केला पराभव

अंतिम फेरीत जयपूर पिंक पँथर्सने पुणेरी पलटणचा 33-29 अशा फरकाने पराभव करून दुसऱ्यांदा विजेतेपदावर कब्जा केला आहे.

Jaipur Pink Panthers

प्रो-कबड्डी लीगच्या नवव्या सिझनचा अंतिम सामना आज, शनिवारी मुंबईतील एनएससीआय एसव्हीपी स्टेडियमवर खेळला गेला. ही लढत जयपूर पिंक पँथर्स आणि पुणेरी पलटण यांच्यात झाली. अंतिम फेरीत जयपूर पिंक पँथर्सने पुणेरी पलटणचा 33-29 अशा फरकाने पराभव करून दुसऱ्यांदा विजेतेपदावर कब्जा केला आहे. पहिल्यांदाच अंतिम फेरीत पोहोचलेल्या पुणेरी संघासाठी अस्लम इनामदार आणि मोहित गोयत ही हिट जोडी रेडिंगसाठी उपस्थित नसल्याने मोठे नुकसान झाले. याआधी पिंक पँथर्स 2014 मध्ये चॅम्पियन बनले होते.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now