Hockey India: आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद जिंकल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी हॉकी संघाचे केले कौतुक, प्रत्येक सदस्याला बक्षीस म्हणून मिळणार इतके पैसे

रोमहर्षक फायनलमध्ये टीम इंडिया एका टप्प्यावर 3-1 ने पिछाडीवर होती, त्यानंतर तिसऱ्या क्वार्टरमध्ये टीम इंडियाने एका मिनिटात दोन शानदार गोल करत जबरदस्त पुनरागमन केले. यानंतर चौथ्या क्वार्टरमध्ये चौथा गोल करत टीम इंडियाने चौथ्यांदा एशियन चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले.

Hockey India: आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद जिंकल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी हॉकी संघाचे केले कौतुक, प्रत्येक सदस्याला बक्षीस म्हणून मिळणार इतके पैसे

India Beat Malaysia: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी शनिवारी आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या (Asian Champions Troph) अंतिम सामन्यात मलेशियाचा 4-3 असा (India Beat Malaysia) पराभव करणाऱ्या भारतीय पुरुष हॉकी संघाच्या प्रयत्नांचे कौतुक केले, तर हॉकी इंडियाने हॉकी संघाच्या प्रत्येक सदस्याला प्रत्येकी 3 लाख रुपये देण्याची घोषणा केली. आणि स्टाफ कर्मचार्‍यांना रु. 1.50 लाख रोख बक्षीस जाहीर केले. रोमहर्षक फायनलमध्ये टीम इंडिया एका टप्प्यावर 3-1 ने पिछाडीवर होती, त्यानंतर तिसऱ्या क्वार्टरमध्ये टीम इंडियाने एका मिनिटात दोन शानदार गोल करत जबरदस्त पुनरागमन केले. यानंतर चौथ्या क्वार्टरमध्ये चौथा गोल करत टीम इंडियाने चौथ्यांदा एशियन चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले. आता टीम इंडिया सर्वाधिक चार वेळा आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणारा देश बनला आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Aug 13, 2023 04:35 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).