UEFA Nations League Finals 2025: स्पेनला हरवून पोर्तुगालने नेशन्स लीग चॅम्पियन ट्रॉफी जिंकली, पेनल्टी शूटआउटमध्ये स्पेनला 5-3 ने हरवले; क्रिस्टियानो रोनाल्डो झाला भावूक
पोर्तुगाल संघाने पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. क्रिस्टियानो रोनाल्डोच्या नेतृत्वाखालील पोर्तुगालने UEFA नेशन्स लीगचे विजेतेपद जिंकले आहे. पोर्तुगालने पेनल्टी शूटआउटमध्ये स्पेनचा 5-3 असा पराभव केला.
UEFA Nations League Finals 2025: पोर्तुगाल संघाने पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. क्रिस्टियानो रोनाल्डोच्या नेतृत्वाखालील पोर्तुगालने UEFA नेशन्स लीगचे विजेतेपद जिंकले आहे. रविवार, 8 जून रोजी खेळल्या गेलेल्या रोमांचक अंतिम सामन्यात पोर्तुगालने स्पेनचा पेनल्टी शूटआउटमध्ये 5-3 असा पराभव केला. निर्धारित वेळेपर्यंत दोन्ही संघ 2-2 असे बरोबरीत होते. अतिरिक्त वेळेतही दोन्ही संघांनी एकही गोल केला नाही. त्यानंतर सामना पेनल्टी शूटआउटमध्ये पोहोचला. स्पेनचा (Spain vs )अल्वारो मोराटा पेनल्टी शूटआउटमध्ये चुकला. तर, पोर्तुगालने त्यांचे पाचही पेनल्टी गोल केले. त्यानंतर पोर्तुगीज संघ दुसऱ्यांदा नेशन्स लीग चॅम्पियन बनला. विजयानंतर क्रिस्टियानो रोनाल्डोला (Cristiano Ronaldo) आपले अश्रू आवरता आले नाहीत.
पेनल्टी शूटआउटमध्ये स्पेन हुकला, पोर्तुगालने इतिहास रचला: