Pele Rushed to Hospital: महान फुटबॉल दिग्गज पेले त्यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात भरती
ईएसपीएन ब्राझीलच्या म्हणण्यानुसार, जेव्हा पेले यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले तेव्हा त्यांच्या संपूर्ण शरीरावर सूज होती.
ब्राझीलचे माजी दिग्गज फुटबॉलपटू पेले यांची तब्येत बिघडली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. महान फुटबॉलपटूंपैकी एक मानले जाणारे पेले यांना साओ पाउलो येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, पेले यांना सूज, हृदयविकार आणि मानसिक समस्यांमुळे रुग्णालयात आणावे लागले. यावरून त्यांच्या कर्करोगावरील उपचारांना यश आलेले नाही असे दिसते.
ईएसपीएन ब्राझीलच्या म्हणण्यानुसार, जेव्हा पेले यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले तेव्हा त्यांच्या संपूर्ण शरीरावर सूज होती. डॉक्टरांना त्यांच्या तपासणीत आढळले की पेले यांच्या हृदयातही समस्या आहे. इंस्टाग्रामवर त्यांची मुलगी केली नॅसिमेंटोने त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले आहे. पेले यांना सप्टेंबर 2021 मध्ये रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तेथून शस्त्रक्रियेद्वारे त्यांच्या शरीरातून ट्यूमर काढण्यात आला होता. शस्त्रक्रियेनंतर त्यांची प्रकृती चिंताजनक होती व त्यामुळे त्यांना अनेक दिवस आयसीयूमध्ये ठेवावे लागले. मात्र नंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली.