Novak Djokovic याला कोर्टाचा दिलासा, व्हिसा रद्द करण्याचा फेडरल सरकारचा निर्णय रद्द केला; ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये खेळण्याचा मार्ग मोकळा

सर्बियाचा जागतिक पुरुष नंबर 1 टेनिसपटू नोवाक जोकोविचचा व्हिसा रद्द करण्याचा फेडरल सरकारचा निर्णय सर्किट कोर्टाने रद्द केला आहे आणि त्याची आता लवर्कच इमिग्रेशन नजरकैदेतून सुटका होईल. कोर्टाच्या या निर्णयांनंतर जोकोविच आता वर्षातील पहिले ग्रँड स्लॅम, ऑस्ट्रेलियन ओपन खेळण्यासाठी सज्ज आहे.

Novak Djokovic (Photo Credit: Twitter)

सर्बियाचा (Serbia) जागतिक पुरुष नंबर 1 टेनिसपटू नोवाक जोकोविचचा (Novak Djokovic) व्हिसा रद्द करण्याचा फेडरल सरकारचा (Federal Government) निर्णय सर्किट कोर्टाने रद्द केला आहे आणि त्याची आता लवर्कच इमिग्रेशन नजरकैदेतून सुटका होईल. जोकोविचचे लसीकरण झाले नसून, त्याला देशात प्रवेश करण्यासाठी यशस्वीरित्या वैद्यकीय सवलत मिळेल होते परंतु गेल्या आठवड्यात मेलबर्नमध्ये (Melbourne) दाखल झाल्यावर ऑस्ट्रेलियन बॉर्डर फोर्सने त्याला डिटेन केले.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement