Women World Boxing: निखत जरीनचा शानदार विजय, बॉक्सिंग वर्ल्ड चॅम्पियनशिप फायनलमध्ये धडक
World Boxing Championship: भारताच्या निखत जरीनने मंगळवारी तुर्कीतील इस्तंबूल येथे आयबीए महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये 52 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. निखतने आता जागतिक चॅम्पियनशिपमध्ये किमान रौप्यपदकाची खात्री केली आहे, परंतु, शुक्रवारी होणाऱ्या अंतिम सामन्यात 25 वर्षीय बॉक्सरचे सर्व लक्ष केवळ सुवर्णपदकावर असेल.
भारताच्या निखत जरीनने (Nikhat Zareen) मंगळवारी तुर्कीतील इस्तान्बुल (Istanbul) येथे आयबीए महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये (Women's Boxing Championship) 52 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. निखतने उपांत्य फेरीत ब्राझीलच्या कॅरोलिन डी आल्मेडाला पराभूत केले आणि आता थायलंडच्या जुटामास जितपॉन्ग हिच्याशी तिची टक्कर होईल.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)