National Games 2023: अजित पवार यांनी घेतली 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंची भेट; क्रीडाध्वज केला तुकडीकडे सुपूर्द
राज्यातील 900 खेळाडू व 200 मार्गदर्शक अशा एकूण 1100 सदस्यांच्या महाराष्ट्राच्या पथकाकडे क्रीडाध्वज हस्तांतर करण्याचा सोहळा तसेच शुभेच्छापर निरोप देण्याचा कार्यक्रम आज पार पडला.
गोवा येथे होत असलेल्या 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्रातील 900 खेळाडू सहभागी होत आहेत. हे 900 खेळाडू व 200 मार्गदर्शक अशा एकूण 1100 सदस्यांच्या महाराष्ट्राच्या पथकाकडे क्रीडाध्वज हस्तांतर करण्याचा सोहळा तसेच शुभेच्छापर निरोप देण्याचा कार्यक्रम आज पार पडला. यावेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राज्य ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी या पथकाची भेट घेतली.
यावेळी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्यापासून गोव्यात सुरु होत असलेल्या 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राचे नऊशे खेळाडू सहभागी होत असून, यावेळीही आपले खेळाडू उत्तम कामगिरी करतील. सर्वाधिक पदके जिंकून राज्याला अव्वल स्थान मिळवून देतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. राज्यातील खेळाडूंना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पदके जिंकण्यासाठी अत्याधुनिक प्रशिक्षणासह सर्वतोपरी मदत करण्यात येत असून, यापुढे खेळांडूच्या तयारीसाठी निधीची अडचण भासणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. (हेही वाचा: 37th National Games 2023: पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी गोव्यात करणार राष्ट्रीय खेळांचे उद्घाटन, देशभरातील खेळाडू आपली प्रतिभा करणार सादर)
Maharashtra Deputy CM and State Olympic Association Chairman Ajit Pawar met the Maharashtra contingent of 1100 persons for the national games starting in Goa tomorrow. He also handed over the game flag of Maharashtra state to the contingent. pic.twitter.com/kxMt3DLHNI
— ANI (@ANI) October 25, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 25, 2023 08:02 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

