Maharashtra Kesari 2022: सातारा येथे अवकाळी पावसामुळे महाराष्ट्र केसरी उपांत्य फेरी सामने शनिवारपर्यंत स्थगित, जाणून घ्या कधी सुरु होणार स्पर्धा
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाने, आज उपांत्य फेरी सामने होणार होते, पण आता ही स्पर्धा 9 एप्रिल शनिवारी सकाळी 8 वाजल्यापासून खेळले जाण्याचे जाहीर केले.
Maharashtra Kesari 2022 Semi-Final: सातारा (Satara) येथे अचानक सुरु झालेल्या अवकाळी पावसामुळे आज, 8 एप्रिल रोजी संध्याकाळी होणाऱ्या केसरी व वरिष्ठ गट राज्य अजिंक्यपद स्पर्धा शनिवार, 9 एप्रिल सकाळपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर (Maharashtra State Wrestling Association) संघाने नुकतेच जाहीर केले. आज उपांत्य फेरी सामने होणार होते, पण आता ही स्पर्धा 9 एप्रिल शनिवारी सकाळी 8 वाजल्यापासून खेळली जाईल.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)