Diksha Dagar Accident in Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिक दरम्यान भारतासाठी वाईट बातमी! भारतीय खेळाडू दीक्षा डागरचा कार अपघात

Paris Olympics 2024: दिक्षाचा अपघात 30 जुलै रोजी संध्याकाळी झाला होता. हा अपघात झाला तेव्हा दीक्षाच्या कुटुंबातील 4 जण कारमध्ये प्रवास करत होते. हरियाणाच्या झज्जर जिल्ह्यातील 23 वर्षीय दीक्षाने 2019 मध्ये तिच्या व्यावसायिक गोल्फ करिअरला सुरुवात केली.

Diksha Dagar Accident in Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिक दरम्यान भारतासाठी वाईट बातमी! भारतीय खेळाडू दीक्षा डागरचा कार अपघात

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिक 2024 मधील भारतीय गोल्फपटूंशी संबंधित एक वाईट बातमी समोर येत आहे. भारतीय गोल्फर दीक्षा डागर हिचा पॅरिसमध्ये अपघात झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दीक्षाचा मोठा अपघात झाला आहे. दिक्षाला कोणतीही गंभीर दुखापत नाही. मात्र तिच्या आईला गंभीर दुखापत झाल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. माहितीनुसार, दिक्षाचा अपघात 30 जुलै रोजी संध्याकाळी झाला होता. हा अपघात झाला तेव्हा दीक्षाच्या कुटुंबातील 4 जण कारमध्ये प्रवास करत होते. हरियाणाच्या झज्जर जिल्ह्यातील 23 वर्षीय दीक्षाने 2019 मध्ये तिच्या व्यावसायिक गोल्फ करिअरला सुरुवात केली. जागतिक क्रमवारीच्या आधारे तिला पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये कोटा पद्धतीने थेट प्रवेश मिळाला होता. दिक्षा ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ नाही. 2020 च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये तिने संयुक्तपणे 50 वे स्थान पटकावले होते.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Aug 01, 2024 07:33 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).