India Beat New Zealand: भारतीय हॉकी संघाने विजयाने केली सुरुवात, गट सामन्यात न्यूझीलंडचा 3-2 असा केला पराभव
टीम इंडियाने रोमहर्षक सामन्यात न्यूझीलंडचा 3-2 असा पराभव केला. भारताकडून मनदीप सिंग, विवेक सागर आणि हरमनप्रीत सिंग यांनी गोल केले.
Paris Olympic 2024: भारतीय हॉकी संघाने चमकदार कामगिरी करत पहिला सामना जिंकला. टीम इंडियाने रोमहर्षक सामन्यात न्यूझीलंडचा 3-2 असा पराभव केला. भारताकडून मनदीप सिंग, विवेक सागर आणि हरमनप्रीत सिंग यांनी गोल केले. हरमनप्रीतने 59व्या मिनिटाला टीम इंडियासाठी विजयी गोल केला. पहिल्या क्वार्टरमध्ये न्यूझीलंडने 0-1 अशी आघाडी घेतली होती. यानंतर भारताने दुसऱ्या क्वार्टरमध्ये पुनरागमन करत 1-1 अशी बरोबरी साधली. टीम इंडियाने तिसऱ्या क्वार्टरमध्ये 2-1 अशी आघाडी घेतली होती. पण चौथ्या क्वार्टरमध्ये न्यूझीलंडने पुनरागमन केले आणि सामना 2-2 असा बरोबरीत सुटला. शेवटी हरमनप्रीतने विजयी गोल करत भारताला विजय मिळवून दिला.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)