India Beat New Zealand: भारतीय हॉकी संघाने विजयाने केली सुरुवात, गट सामन्यात न्यूझीलंडचा 3-2 असा केला पराभव

टीम इंडियाने रोमहर्षक सामन्यात न्यूझीलंडचा 3-2 असा पराभव केला. भारताकडून मनदीप सिंग, विवेक सागर आणि हरमनप्रीत सिंग यांनी गोल केले.

India Beat New Zealand: भारतीय हॉकी संघाने विजयाने केली सुरुवात, गट सामन्यात न्यूझीलंडचा 3-2 असा केला पराभव
Hockey-Team-India (Photo Credit - Twitter)

Paris Olympic 2024: भारतीय हॉकी संघाने चमकदार कामगिरी करत पहिला सामना जिंकला. टीम इंडियाने रोमहर्षक सामन्यात न्यूझीलंडचा 3-2 असा पराभव केला. भारताकडून मनदीप सिंग, विवेक सागर आणि हरमनप्रीत सिंग यांनी गोल केले. हरमनप्रीतने 59व्या मिनिटाला टीम इंडियासाठी विजयी गोल केला. पहिल्या क्वार्टरमध्ये न्यूझीलंडने 0-1 अशी आघाडी घेतली होती. यानंतर भारताने दुसऱ्या क्वार्टरमध्ये पुनरागमन करत 1-1 अशी बरोबरी साधली. टीम इंडियाने तिसऱ्या क्वार्टरमध्ये 2-1 अशी आघाडी घेतली होती. पण चौथ्या क्वार्टरमध्ये न्यूझीलंडने पुनरागमन केले आणि सामना 2-2 असा बरोबरीत सुटला. शेवटी हरमनप्रीतने विजयी गोल करत भारताला विजय मिळवून दिला.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jul 27, 2024 10:58 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).