India Open 2022: शटलर साई प्रणीत आणि ध्रुव रावत कोविड-19 पॉझिटिव्ह, सुपर 500 स्पर्धेतून घेतली माघार

दोन वर्षानंतर आयोजित होणारी ही स्पर्धा 11 ते 16 जानेवारी दरम्यान नवी दिल्ली येथे कठोर कोविड-19 प्रोटोकॉल अंतर्गत आयोजित आहे. PTI च्या म्हणण्यानुसार, सर्दी आणि खोकला यासह सौम्य लक्षणे दिसल्यानंतर प्रणीतला घरीच क्वारंटाईन करण्यात आले आहे.

साई प्रणीत (Photo Credit: @BAI_Media/Twitter)

India Open 2022: भारताचे साई प्रणीत (Sai Praneeth) आणि ध्रुव रावत (Dhruv Rawat) यांची कोविड-19 चाचणी पॉझिटिव्ह आल्याने दोघे इंडिया ओपन (India Open) सुपर 500 बॅडमिंटन स्पर्धेतून बाहेर पडले. दोन वर्षानंतर आयोजित होणारी ही स्पर्धा 11 ते 16 जानेवारी दरम्यान नवी दिल्ली येथे कठोर कोविड-19 प्रोटोकॉल अंतर्गत आयोजित आहे.