India Beat Pakistan: भारताने पाकिस्तानला केले पराभूत, रोमहर्षक लढतीनंतर पटकावले विजेतेपद

या स्पर्धेतील तीन सामन्यांमधला भारतीय संघाचा हा पहिला विजय ठरला. भारताने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा रोमहर्षक शूटआऊटमध्ये 2-0 असा पराभव करून उद्घाटनाच्या हॉकी 5 आशिया चषकावर नाव कोरले.

Hockey 5s Asia Cup 2023: पुरुष हॉकी फाइव्ह आशिया कपमध्ये आशियातील अव्वल संघ आमनेसामने होते. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाचा सामना पाकिस्तानशी झाला. टीम इंडियाने हा सामना जिंकून चषक जिंकला. या स्पर्धेतील तीन सामन्यांमधला भारतीय संघाचा हा पहिला विजय ठरला. भारताने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा रोमहर्षक शूटआऊटमध्ये 2-0 असा पराभव करून उद्घाटनाच्या हॉकी 5 आशिया चषकावर नाव कोरले. निर्धारित वेळेपर्यंत 4-4 अशी बरोबरी होती. या विजयासह भारताने FIH हॉकी 5 विश्वचषक 2024 मध्येही प्रवेश केला. भारताकडून मोहम्मद राहिल (19 व 26वे), जुगराज सिंग (7वे) आणि मनिंदर सिंग (10वे) यांनी नियमित वेळेत गोल केले. गुरजोत सिंग आणि मनिंदर सिंग यांनी शूटआऊटमध्ये गोल केले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)