Pro Govinda 2023 Winner: प्रो-गोविंदा स्पर्धेत जय जवान गोविंदा पथकाने कडक 8 थर लावुन मिळवले पहिले 11 लाख रुपयाचे बक्षिस (Watch Video)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शन आणि सूचनेनुसार प्रो-गोविंदा स्पर्धा पार पडली.

राज्यात पहिल्यांदाच प्रो-कबड्डीच्या धर्तीवर वरळी येथील इन डोअर स्टेडियममध्ये गुरुवारी प्रो-गोविंदा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शन आणि सूचनेनुसार प्रो-गोविंदा स्पर्धा पार पडली. दरम्यान, प्रो-गोविंदा लीगचे पहिले विजेते होण्याचा मान मिळाला तो जय जवान दहीहंडी पथकाला. स्पर्धेत एकूण 14 संघांचा सहभाग होता. केवळ 42.51 सेकंदात 8 थर लावून जय जवान पथकाने जेतेपदाला गवसणी घातली आणि पहिले 11 लाख रुपयाचे बक्षिस मिळवले. तर कोकण नगर पथक आणि आर्यन्स पथकाने अनुक्रमे 46.30 आणि 48.03 सेकंदात 8 थर लावून दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावला.

पहा व्हिडिओ

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement