Heath Streak Passes Away: झिम्बाब्वेचा माजी क्रिकेटपटू हीथ स्ट्रीक यांचे निधन,कुटुंबीयांकडून वृत्ताला दुजोरा

झिम्बाब्वेचा माजी क्रिकेटपटू हीथ स्ट्रीक यांचे निधन (Heath Streak Passes Away) झाले आहे. आज ( 3 सप्टेंबर) पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाच्या वृत्ताला त्यांच्या कुटुंबीयांनीही दुजोरा दिला आहे. या आधीही त्यांच्या निधनाच्या बातम्या आल्या होत्या मात्र त्या केवळ अफवा असल्याचे पुढे आले होते. दरम्यान, आता त्यांच्या कुटुंबीयांनीच निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे

Heath Streak | (File Image)

झिम्बाब्वेचा माजी क्रिकेटपटू हीथ स्ट्रीक यांचे निधन (Heath Streak Passes Away) झाले आहे. आज ( 3 सप्टेंबर) पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाच्या वृत्ताला त्यांच्या कुटुंबीयांनीही दुजोरा दिला आहे. या आधीही त्यांच्या निधनाच्या बातम्या आल्या होत्या मात्र त्या केवळ अफवा असल्याचे पुढे आले होते. दरम्यान, आता त्यांच्या कुटुंबीयांनीच निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

स्ट्रीकने झिम्बाब्वेसाठी 65 कसोटी आणि 189 एकदिवसीय सामने खेळले, त्यांनी अनुक्रमे 1990 आणि 2943 धावा केल्या. तथापि, चेंडूवरील त्याच्या पराक्रमाने त्याला इतरांपेक्षा वेगळे केले. कसोटी क्रिकेटमध्ये 216 आणि एकदिवसीय सामन्यात 239 विकेट्स घेऊन, तो झिम्बाब्वेचा सर्वकालीन सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now