FIFA World Cup 2022 Draw: स्पेन आणि जर्मनी एकाच गटात, मेक्सिको लिओनेल मेस्सीच्या अर्जेंटिनाशी भिडणार; पहा संपूर्ण ग्रुप ऑफ डेथ

नोव्हेंबरमध्ये फिफा विश्वचषक स्पर्धा खेळली जाणार आहे. क्रिस्टियानो रोनाल्डोचा सामना एच गटात लुईस सुआरेझ आणि मँचेस्टर युनायटेडचा सहकारी एडिनसन कावानी यांच्याशी होईल तर लिओनेल मेस्सी याला रॉबर्ट लेवांडोस्की याच्याशी भिडेल. अंतिम तीन स्पॉट्ससाठी प्लेऑफ जूनमध्ये खेळले जातील.

कतर फिफा वर्ल्ड कप 2022 (Photo Credit: Getty Images)

FIFA World Cup Draws: यावर्षी नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या वर्ल्ड कपचा (FIFA World Cup) अंतिम ड्रॉ समोर आला आहे. विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत अमेरिकेचा (USA) सामना ब गटात इंग्लंड (England) आणि इराणशी (Iran) होईल तर इ गटातील माजी विजेत्यांच्या सामन्यात स्पेनची (Spain) लढत जर्मनीशी (Germany) होईल. तसेच गतविजेता फ्रान्सची (France) ड गटात डेन्मार्क आणि ट्युनिशियाशी गाठ पडेल तर 21 नोव्हेंबर रोजी यजमान कतार (Qatar) आणि इक्वेडोर (Ecuador) यांच्या मॅचने स्पर्धेला सुरुवात होईल.