Delhi Police कडून BJP MP Brij Bhushan Singh यांच्या विरोधातील POCSO Case मध्ये Cancellation Report दाखल; Sexual Harassment Case बाबत चार्जशीट

केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी 7 जून रोजी ऑलिम्पिक पदक विजेते कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक यांची भेट घेतली होती आणि आंदोलक कुस्तीपटूंना 15 जूनपर्यंत आरोपपत्र दाखल करण्याचे आश्वासन दिले होते.

Brijbhushan Sharan Singh

दिल्ली पोलिसांनी WFI चे माजी प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंग यांच्यावर लैंगिक छळाच्या आरोपात चार्जशीट दाखल केली आहे. बृजभूषण शरण सिंग यांच्याविरुद्ध 354, 354-ए आणि डी आणि 109, 354, 354 (ए), 506 अन्वये विनोद तोमर यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार आणि कथित आरोपींच्या POCSO स्टेटमेंट अंतर्गत रद्दीकरण अहवाल दाखल केला आहे. दरम्यान विशेष सरकारी वकील अतुल श्रीवास्तव यांनी माध्यमांना सांगितले की, राऊस अव्हेन्यू कोर्टात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. POCSO प्रकरणाबाबत,  पटियाला हाऊस कोर्टासमोर रद्दीकरण अहवाल दाखल करण्यात आला आहे आणि हे प्रकरण 04 जुलै रोजी पुढील विचारासाठी निश्चित करण्यात आले आहे. 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now