Common wealth Games 2022: पीएम नरेंद्र मोदी उद्या घेणार कॉमन वेल्थ गेम्स 2022 मधील सर्व पदक विजेत्या खेळाडूंची भेट

भारताने बर्मिंगहॅममध्ये 22 सुवर्ण, 16 रौप्य आणि 23 कांस्य पदके जिंकली.

Pm Narendra Modi (Photo Credit - Twitter)

पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्स 2022 मधील पदक विजेत्यांची भेट घेणार आहेत. पंतप्रधान सकाळी 11 वाजता त्यांच्या शासकीय निवासस्थानी भारतीय खेळाडूंना भेटतील. एएनआय या वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे. भारताने बर्मिंगहॅममध्ये 22 सुवर्ण, 16 रौप्य आणि 23 कांस्य पदके जिंकली. बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये भारतीय खेळाडूंनी कुस्ती आणि वेटलिफ्टिंगमध्ये सर्वाधिक पदके जिंकली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)