Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये चीनने जिंकले पहिले सुवर्णपदक, 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत विजयी
चीनच्या हुआंग युटिंग आणि शेंग लिहाओ यांनी शनिवारी झालेल्या 10 मीटर एअर रायफल मिश्र सांघिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. या स्पर्धेत दक्षिण कोरियाच्या किम जी-ह्योन आणि पार्क हा-जुन या जोडीने रौप्यपदक जिंकले, तर कझाकिस्तानच्या अलेक्सांद्रा ले आणि इस्लाम सत्पायेव यांनी कांस्यपदक पटकावले.
Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकमधील पहिले सुवर्णपदक चीनने पटकावले आहे. चीनच्या हुआंग युटिंग आणि शेंग लिहाओ यांनी शनिवारी झालेल्या 10 मीटर एअर रायफल मिश्र सांघिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. या स्पर्धेत दक्षिण कोरियाच्या किम जी-ह्योन आणि पार्क हा-जुन या जोडीने रौप्यपदक जिंकले, तर कझाकिस्तानच्या अलेक्सांद्रा ले आणि इस्लाम सत्पायेव यांनी कांस्यपदक पटकावले. या विजयासह चीनने पॅरिस ऑलिम्पिकच्या सुरुवातीला दमदार कामगिरी केली आहे. हुआंग युटिंग आणि शेंग लिहाओ या जोडीने आपल्या उत्कृष्ट नेमबाजीने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले आणि आपल्या देशासाठी पहिले सुवर्णपदक जिंकले. दक्षिण कोरियाच्या संघाचेही चांगल्या कामगिरीचे कौतुक करण्यात आले, तर कझाकिस्तान संघानेही कांस्यपदक जिंकून आपल्या देशाचा गौरव केला. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये चीनचे सुमारे 388 खेळाडू सहभागी होत आहेत.