Badminton Asia Championships 2022: पीव्ही सिंधूची उपांत्य फेरीत धडक, थरारक सामन्यात चिनी खेळाडूला चारली पराभवाची धूळ

दुहेरी ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधू 2014 नंतर प्रथमच आशियाई बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचली आहे. 5व्या मानांकित सिंधूने शुक्रवारी उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत चीनच्या हि बिंगजियाओला पराभूत केले. अशाप्रकारे शुक्रवारी झालेल्या थरारक विजयासह, सिंधूने 2014 नंतर प्रथमच बॅडमिंटन आशिया चॅम्पियनशिपच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आणि किमान कांस्य पदक निश्चित केले आहे.

Badminton Asia Championships 2022: पीव्ही सिंधूची उपांत्य फेरीत धडक, थरारक सामन्यात चिनी खेळाडूला चारली पराभवाची धूळ
पीव्ही सिंधू (Photo Credit: PTI)

भारताच्या पीव्ही सिंधूने (PV Sindhu) शुक्रवार, 29 एप्रिल रोजी बॅडमिंटन आशिया चॅम्पियनशिप (Badminton Asia Championship) 2022 च्या उपांत्यपूर्व फेरीत चीनच्या He Bingjiao हीच 21-9, 13-21, 21-19 असा पराभव करून सेमीफायनल सामन्यात धडक मारली आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 29, 2022 03:37 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).