Asian Games Postponed: खेळाडूंसाठी वाईट बातमी, चीनमधील आशियाई क्रीडा स्पर्धा ‘अनिश्चित काळासाठी’स्थगित, Hangzhou येथे सप्टेंबरमध्ये होणार होता कार्यक्रम
आशियाई खेळ 10 ते 22 सप्टेंबर दरम्यान चीनच्या हांगझोऊ शहरात होणार होते. तथापि, आयोजकांनी कोविड-19 महामारीमुळे 2023 पर्यंत खेळ पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. चीनच्या राज्य माध्यमांनी देखील निर्णयाची प्रथम पुष्टी केली. देशाचे आर्थिक केंद्र शांघाय येथे एका महिन्यापासून लॉकडाऊन आहे तर बीजिंगमध्ये आता आणखी अंकुश लावण्यात आले आहेत.
Asian Games Postponed: चीनच्या हँगझोऊ (Hangzhou) शहरात सप्टेंबरमध्ये आयोजित होणारे आशियाई खेळ (Asian Games) 2022 कोविड -19 महामारीमुळे (COVID Pandemic) 2023 पर्यंत पुढे ढकलण्यात आले आहेत. ऑलिम्पिक कौन्सिल ऑफ आशियाने (Olympic Council of Asia) पुष्टी केली की आशियाई खेळ 2023 पर्यंत पुढे ढकलले जातील, अशी बातमी रॉयटर्सने शुक्रवारी दिली.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)