Asian Championship Trophy: भारतीय हॉकी संघाने जपानचा 5-0 असा पराभव करत मारली अंतिम फेरीत धडक; मलेशियाशी होणार फायनल
कर्णधार हरमनप्रीत सिंगने स्पर्धेतील आठवा गोल केला. सिंग हा स्पर्धेतील सर्वाधिक गोल करणारा खेळाडू आहे. अंतिम फेरीत भारताचा सामना सेमीफायनल 1 च्या विजेत्या मलेशियाशी होईल.
भारतीय हॉकी संघाने चेन्नई येथे खेळल्या जाणाऱ्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. या स्पर्धेतील एकमेव अपराजित संघ असलेल्या भारताने शुक्रवारी उपांत्य फेरीत जपानचा एकतर्फी सामन्यात 5-0 असा पराभव केला. आकाशदीप सिंगने 19व्या मिनिटाला, कर्णधार हरमनप्रीत सिंगने 23व्या मिनिटाला, मनदीप सिंगने 30व्या मिनिटाला, सुमितने 39व्या मिनिटाला आणि कार्ती सेल्वमने 51व्या मिनिटाला गोल केले. कर्णधार हरमनप्रीत सिंगने स्पर्धेतील आठवा गोल केला. सिंग हा स्पर्धेतील सर्वाधिक गोल करणारा खेळाडू आहे. अंतिम फेरीत भारताचा सामना सेमीफायनल 1 च्या विजेत्या मलेशियाशी होईल. भारताने ग्रुप स्टेजमध्ये मलेशियाचा 5-0 असा पराभव केला आहे. भारताने पाचव्यांदा फायनलमध्ये प्रवेश केला आहे. (हेही वाचा: IND vs WI T20I Series: टीम इंडियाचा मोठा विक्रम धोक्यात, टी-20 मालिका कोणत्याही परिस्थितीत जिंकावीच लागेल)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)