Asian Champions Trophy 2021: आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी 20 सदस्यीय गतविजेत्या भारतीय संघाची घोषणा, मनप्रीत सिंह करणार नेतृत्व; पहा संपूर्ण टीम

ढाका येथे होणाऱ्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी 20 सदस्यीय भारतीय पुरुष हॉकी संघाची घोषणा झाली आहे. ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता कर्णधार मनप्रीत सिंह संघाचे नेतृत्व नेतृत्व करेल, तर स्टार ड्रॅग फ्लिकर हरमनप्रीत सिंहला 14 ते 22 डिसेंबर दरम्यान होणाऱ्या स्पर्धेसाठी उपकर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. भारत 14 डिसेंबर रोजी कोरियाविरुद्ध पहिला सामना खेळेल.

भारतीय पुरुष हॉकी टीम (Photo Credits: PTI)

ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता कर्णधार मनप्रीत सिंग (Manpreet Singh) पुढील महिन्यात ढाका  (Dhaka) येथे होणाऱ्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये (Asian Champions Trophy) 20 सदस्यीय भारतीय पुरुष हॉकी संघाचे नेतृत्व करेल. विशेष म्हणजे अनुभवी गोलकीपर पीआर श्रीजेशला (PR Sreejesh) विश्रांती देण्यात आले असून क्रिशन बहादूर पाठक आणि सूरज करकेरा यांना गोलकीपर म्हणून स्थान मिळाले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now