35th Pune International Marathon 2022: 27 फेब्रुवारी रोजी पार पडणार 'पुणे इंटरनॅशनल मॅरेथॉन'; जाणून घ्या कुठे करू शकाल नाव नोंदणी
येत्या 27 फेब्रुवारी 2022 रोजी 'पुणे इंटरनॅशनल मॅरेथॉन'चे आयोजन केले आहे
येत्या 27 फेब्रुवारी 2022 रोजी 'पुणे इंटरनॅशनल मॅरेथॉन'चे आयोजन केले आहे. यासाठी 15 ऑक्टोबरपासून ऑनलाइन नाव नोंदणीला सुरुवात होत आहे. या मॅरेथॉनवेळी सर्व कोविड-19 नियमांचे पालन होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे. इच्छुक www.marathonpune.com या संकेतस्थळावर नाव नोंदणी करू शकतात. 31 जानेवारीपर्यंत नाव नोंदणी करता येणार आहे.
यंदाची ही 35 वी पुणे इंटरनॅशनल मॅरेथॉन 2022 भारताची प्रीमियम मॅरेथॉन स्पर्धा ठरणार आहे. 1983 पासून, सर्व क्षेत्रातील हजारो धावपटूंनी या स्पर्धेत भाग घेतला आहे. सामाजिक संदेश पसरवणे आणि निधी गोळा करणे या स्पर्धेचे उद्दिष्ट आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)