World Athletics Championships: नीरज चोप्राने जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदकावर कोरले नाव

नीरज चोप्राने रौप्य पदक जिंकून इतिहास रचला आहे.

Neeraj Chopra (Ohoto Credit - Twitter)

टोकियो ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्राने जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक जिंकले आहे. नीरज चोप्राने रौप्य पदक जिंकून इतिहास रचला आहे.  नीरजने चौथ्या प्रयत्नात 88.13 मीटर फेकले, जे त्याला रौप्य पदक मिळवून देण्यासाठी पुरेसे होते. या स्पर्धेचे सुवर्णपदक ग्रॅनाडा अँडरसन पीटर्सने 90.54 मीटर फेक करून जिंकले. ग्रेनेडाचा अँडरसन पीटर्स जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आहे, तर नीरज चोप्राचा सध्या जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर आहे. अँडरसनची सर्वोत्तम थ्रो 93.07 मीटर आहे तर नीरज चोप्राची सर्वोत्तम थ्रो 89.94 मीटर आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)