MI vs DC: मुंबई इंडियन्सचा पहिला विजय, दिल्ली कॅपिटल्सचा 6 गडी राखून केला पराभव

तर दिल्लीचा सलग चौथा सामना हरला. प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने 173 धावांचे लक्ष्य दिले होते, जे मुंबईने शेवटच्या चेंडूवर 4 गडी गमावून पूर्ण केले.

मुंबई इंडियन्स (Photo Credit: Twitter/IPL)

मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा 6 गडी राखून पराभव करून IPL 2023 मधील पहिला विजय नोंदवला आहे. त्याचबरोबर दिल्लीची खाते उघडण्याची प्रतीक्षा आणखी वाढली आहे. मुंबईचा हा तिसरा सामना होता आणि दोन पराभवानंतर तिने बाजी मारली. तर दिल्लीचा सलग चौथा सामना हरला. प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने 173 धावांचे लक्ष्य दिले होते, जे मुंबईने शेवटच्या चेंडूवर 4 गडी गमावून पूर्ण केले. मुंबईला विजयासाठी शेवटच्या चेंडूवर 2 धावांची गरज होती, एनरिच नॉर्खियाच्या चेंडूवर टीम डेव्हिड 2 धावांवर धावला आणि मुंबई इंडियन्सला मोसमातील पहिला विजय मिळवून दिला. मुंबईने दिल्लीवर 6 गडी राखून मात केली. हेही वाचा MI vs DC: कॅच घेताना सूर्यकुमार यादव जखमी, क्षेत्ररक्षण करताना झाली दुखापत

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)