India wins T20 World Cup 2024: लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि सभागृहाकडून रोहित शर्मा आणि संपूर्ण टीम इंडियाचे अभिनंदन; विजयाबद्दल कौतुकाचा वर्षाव
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि सर्व सभागृह नेते यांनी कर्णधार रोहित शर्मा आणि संपूर्ण टीम इंडियाचे विजयाबद्दल अभिनंदन केले.
India wins T20 World Cup 2024: टी-20 विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना (T20 World Cup 2024 Final) शनिवारी भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ (IND vs SA) यांच्यात खेळवला गेला. टीम इंडियाने या विश्वचषकात चमकदार कामगिरी केली आणि संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहिली. भारतीय संघांच्या शानदार विजयानंतर टीम इंडिया मालामालही झाली. त्यात आज लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि सर्व सभागृह नेते यांनी कर्णधार रोहित शर्मा आणि संपूर्ण टीम इंडियाचे विजयाबद्दल अभिनंदन केले. या सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा सात धावांनी पराभव करत दुसऱ्यांदा आयसीसी टी-20 विश्वचषकावर कब्जा केला आहे. (हेही वाचा:Prize Money of 125 Crores for Team India: जय शाहची मोठी घोषणा! टी-20 विश्वचषक जिंकल्याबद्दल टीम इंडियाला 125 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम जाहीर )
पोस्ट पहा-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)