India wins T20 World Cup 2024: लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि सभागृहाकडून रोहित शर्मा आणि संपूर्ण टीम इंडियाचे अभिनंदन; विजयाबद्दल कौतुकाचा वर्षाव
टी-20 विश्वचषकात चमकदार कामगिरीच्या जोरावर भारतीय संघांचा शानदार विजय झाला. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि सर्व सभागृह नेते यांनी कर्णधार रोहित शर्मा आणि संपूर्ण टीम इंडियाचे विजयाबद्दल अभिनंदन केले.
India wins T20 World Cup 2024: टी-20 विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना (T20 World Cup 2024 Final) शनिवारी भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ (IND vs SA) यांच्यात खेळवला गेला. टीम इंडियाने या विश्वचषकात चमकदार कामगिरी केली आणि संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहिली. भारतीय संघांच्या शानदार विजयानंतर टीम इंडिया मालामालही झाली. त्यात आज लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि सर्व सभागृह नेते यांनी कर्णधार रोहित शर्मा आणि संपूर्ण टीम इंडियाचे विजयाबद्दल अभिनंदन केले. या सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा सात धावांनी पराभव करत दुसऱ्यांदा आयसीसी टी-20 विश्वचषकावर कब्जा केला आहे. (हेही वाचा:Prize Money of 125 Crores for Team India: जय शाहची मोठी घोषणा! टी-20 विश्वचषक जिंकल्याबद्दल टीम इंडियाला 125 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम जाहीर )
पोस्ट पहा-
#WATCH | Lok Sabha Speaker Om Birla and the House congratulates Cricket Skipper Rohit Sharma and the entire Team India on winning #T20WorldCup2024 pic.twitter.com/MOI144KSxh
— ANI (@ANI) July 1, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jul 01, 2024 12:59 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

